Sale!

द लॉस्ट बॅलन्स

500.00 490.00

Description

‘द लॉस्ट बॅलन्स’ ही लाक्षणिक अर्थाने देखील ढळलेल्या तोलाची कहाणी आहे.अंतर्मुख करणारी,अस्वस्थ करणारी,सुन्न करणारी.

अर्थकारण हा विषय मराठी साहित्याने फारसा कधी जिव्हाळ्याने मनावर घेतलेला दिसत नाही रामदास खरे यांच्या ‘द लॉस्ट बॅलन्स’ या कादंबरीने मात्र परिश्रमपूर्वक बँकिंग क्षेत्राचे ताणेबाणे उलगडून दाखविले आहेत.राजकारणी, क्षुद्र स्वार्थ साधताना सारासार विचार हरवून बसणारी सामान्य माणसं,आपली आयुष्यभराची पुंजी बँकांच्या हवाली करणारे वयस्कर नागरिक,ठेवीदार आणि त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर गिधाडासारखे तुटून पडलेले निर्लज्ज संचालक आणि त्यांच्या आशीर्वादाने निडर झालेले कर्जदार यांच्या भेदक चित्रणातून साकार झालेली ही उत्कंठावर्धक कादंबरी.

लेखकाला आतून हे क्षेत्र माहिती असावे,इतक्या तपशिलांच्या बारकाव्यानिशी वाचकांच्या समोर सहकारी बँकांच्या अंत:स्थ कारभाराची जणू चित्रफित उलगडत नेते ही कादंबरी.एका स्तरावर बँकेतील कामकाज आणि दुसऱ्या स्तरावर माणसे…त्यांचं बँकेशी असणारं विविध प्रकारचं नातं… त्यांचं वैयक्तिक आयुष्य…. त्यातले ताण… हे धागे जुळवत समकालीन वास्तवाचा पट ती मांडते.हा पट काळ्या-करड्या -सफेद रंगांच्या धाग्यांच्या चित्रविचित्र विणीने बनला आहे. बँकिंगसारख्या एरवी काहीशा रुक्ष वाटणाऱ्या क्षेत्राचे हे समकालीन वास्तव डोळे उघडणारे दर्शन घडवते,ते लेखकाच्या थेट आणि पारदर्शी शैलीमुळे वाचनीय झाले आहे.

डॉ. वंदना बोकील कुलकर्णी