AJAY YODHA

Description

‘ आम्ही कान्होजी आंग्रे. सरखेल कान्होजी आंग्रे.या कोकण प्रदेशाचे स्वामी,कोकण किनारपट्टीचे आम्ही सर्वाधिकारी. अलिबागपासून श्रावणकोरपर्यंत पसरलेल्या पश्चिम किनारपट्टीचे अनभिषिक्त सम्राट.केवढा बहुमान मिळालाय आम्हाला.सिधोजी गुजरांच्या मृत्यूनंतर आमची सरखेल पदी नियुक्ती झालीय. ‘ सुवर्णदुर्ग ‘, ‘ विजयदुर्ग ‘,कुलाबा, सागर गड, रत्नगड,अनेक दुर्ग आमच्या अखत्यारीत.आज केवढा सन्मान मिळालाय आम्हाला.छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराराणी ह्यांनी आमचं कर्तुत्व जाणून केलेला सन्मान. सिधोजी गुजारांच्या अनुपस्थितीत आम्ही सुवर्णदुर्ग मर्दमुकिनी सांभाळला. विजयदुर्गाची तटबंदी करून घेतली. कोकण प्रांत उत्तमरितीने सांभाळला.संभाजी महाराजांच्या वधानंतर जी दोलायमान परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीचा फायदा घेऊन कोकण किनारपट्टीचे अनेक किल्ले औरंगजेबाने जिंकून घेतले. पण राजाराम महाराजांच्या आरमारात दुय्यम अधिकारी म्हणून दाखल झाल्यानंतर आपण हे सर्व किल्ले,प्रांत यावर आपले अधिपत्य स्थापन करावयास सुरुवात केली.आपल्या या पराक्रमाची दाखल घेत राजाराम महाराजांनी प्रथम सुवर्णदुर्गेचा किल्लेदार आणि आत्ता

आरमाराचं सरखेलपद ! त्यांची मान गर्वाने ताठ झाली होती.राजदरबारी हा सन्मान आम्हाला सन्मानाने देण्यात येणार होता.पित्याची तुकोजींची वाक्य मनात घोळत होती.” एक दिवस ह्या सागराचा राजा म्हणून तुझी ओळख असेल ” आणि ब्रम्हेंद्रस्वामिंनी दिलेला आशीर्वाद. ‘खरंच आज आम्ही अत्यंत आनंदित आहोत.गर्वाने आमची मान उन्नत झालीय.’