Gandh Mogryacha

200.00

Category:

Description

निशब्दतेला शब्दवाचा देणे,हेच कवितेचे संचित असते.तर्कांतीत गूढतेचे मौन शब्दांत बोलके करणे,ही कवितेच्या सृजनाची मुक प्रक्रिया असते.

डॉक्टर बोंडे यांचा ‘गंध मोगऱ्याचा’हा कवितासंग्रह आस्वादताना माझ्या हृदयाचे आनंदवनभुवन झाले…! मोगऱ्याच्या फुलांसारखे मार्दवी व कोवळेपण आणि मधुरतम गंध असलेल्या कवितांचे
एकेक पान म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच ठरावी..!

अत्तर जणू बिलगले वाऱ्यास भोवताली

सुटताच हाय नाजूक तो गंध मोगऱ्याचा..

निखालस निर्मळ व तितकेच सात्विक प्रीतीचे धुमारे ही कविता सहजपणे देत राहते.प्रीतीत ओथंबून आलेली भरती व मनात दाटलेली आरती यांचा संगम येथे खळाळून राहिला आहे.प्रीतीचा हळुवार गंध जसा वाऱ्याला आधी सुगंधित करतो आणि मग मनातील ताऱ्याला वेढून उरतो, अशी स्वप्नगंधसारिणी म्हणजेच ‘गंध मोगऱ्याचा’ मधील डॉ.विवेक बोंडे यांनी लिहिलेली अतिशय सालस,निरागस,निर्व्याज कविता आहे…!

प्रा.अशोक बागवे

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gandh Mogryacha”

Your email address will not be published. Required fields are marked *