विषाक्त
₹180.00 ₹170.00
Description
अब्दुल बिस्मिल्लाह यांची ‘विषाक्त’ ही लघु कादंबरी वाचताना वाचक हादरून जातो. ही कादंबरी वाचून झाल्यानंतर एक विषण्य आणि भयाण जीवनाच्या अनुभवातून वाचक
गेल्याशिवाय राहत नाही.हा अनुभव एक महान आणि महाकादंबरी वाचल्यासारखा असतो.इतक्या बारीक-सारीक तपशीलांनी,प्रसंगांनी,घटनांनी ही कादंबरी शिगोशिग भरलेली आहे.परिस्थिती आणि परिसर याविषयीचे अफलातून वर्णन या कादंबरीत वाचायला मिळते. नर्मदा नदी आणि भोवतालचे जंगल यांचे वर्णन वाचताना रम्य अनुभव येतो.तर अब्बा-अम्मा या पती-पत्नीच्या फाटक्या संसाराची दाहकता वाचताना वाचक सुन्न होतो.एकाचवेळी रम्य आणि रौद्र असा अनुभव देणारी अशी ही विलक्षण कलाकृती आहे.अत्यंत कमी शब्दात जगण्यातील होरपळ ताकदीने इथे व्यक्त झाली आहे.लेखकाची प्रतिमा आणि त्याने मांडलेले जीवन एका नव्या दारिद्री आणि भग्न विश्वाची जाणीव करून देणारे आहे.ही कादंबरी वाचणे म्हणजे पती-पत्नी,बाप-लेक यांच्यातील मर्मबंधाची आणि विस्कटलेल्या भयानक दुःखाची अनुभूती समजून घेणे होय.अम्मू इतकी सहनशील स्त्री मी
आजपर्यंत अन्यत्र वाचलेली नाही.तिचा दारूण अंत वाचताना वाचक हेलावून जातो.यापूर्वी कधीही न वाचलेले,कधी न समजून घेतलेले,अत्यंत भीषण आणि अस्वस्थ करणारे जीवन विषाक्त या कादंबरीत वाचायला मिळते.ही कादंबरी वाचताना आपण एका भयव्याकूळ दुःखाचा प्रवास करीत आहोत असेच वाटत राहते.
-शरणकुमार लिंबाळे
Reviews
There are no reviews yet.