सर्वांसाठी शिक्षण
₹300.00
विटभट्टी, बांधकाम, ऊसतोडणी, नंदीबैल, उंटवाले, कडकलक्ष्मी संबंधित कामगारांची मुले त्यांच्या राहण्याच्या जागेत होणाऱ्या बदलामुळे शिक्षणापासून वंचित रहातात. त्याचप्रमाणे उच्चभू सोसायटीत काम करणाऱ्यांची व भीक मागणारी मुले देखील शाळेपासून लांबच राहतात. याची जाणीव ‘कॉलेज ऑफ सोशलवर्क’ येथे शिकणाऱ्या (निर्मला निकेतन ) प्रा. रजनी परांजपे यांना झाली. म्हणून त्यांनी ‘डोअर स्कूल’ची स्थापना केली.
लेखिका : रजनी परांजपे
कृष्णधवल पाने : २१६
रंगीत पाने : ४
किंमत : रु.३००/-
पुस्तक प्रकार : ललित
Description
लेखिका : रजनी परांजपे
कृष्णधवल पाने : २१६
रंगीत पाने : ४
किंमत : रु.३००/-
पुस्तक प्रकार : ललित
विटभट्टी, बांधकाम, ऊसतोडणी, नंदीबैल, उंटवाले, कडकलक्ष्मी संबंधित कामगारांची मुले त्यांच्या राहण्याच्या जागेत होणाऱ्या बदलामुळे शिक्षणापासून वंचित रहातात. त्याचप्रमाणे उच्चभू सोसायटीत काम करणाऱ्यांची व भीक मागणारी मुले देखील शाळेपासून लांबच राहतात. याची जाणीव ‘कॉलेज ऑफ सोशलवर्क’ येथे शिकणाऱ्या (निर्मला निकेतन ) प्रा. रजनी परांजपे यांना झाली. म्हणून त्यांनी ‘डोअर स्कूल’ची स्थापना केली. वेगवेगळ्या वस्त्यामधील मुलांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली. मुलांचे व पालकांचे विविध प्रश्न व अडचणी समजून घेतल्या व त्यावर तोडगे काढलेत. त्यांच्या पालकांचा विरोध नव्हताच परंतु आपल्या सारख्या सुशिक्षितांना हा प्रश्न का पडत नाही हे एक कोडेच आहे. यशापयशाची पर्वा न करता गेली ३० वर्ष हा शिक्षणाचा यज्ञ त्यांनी चालू ठेवला आहे. शासनाच्या सर्वांसाठी शिक्षण या घोषणेला सर्वत्र योग्य तो प्रतिसाद मिळाला किंवा नाही परंतु परांजपे मॅडमची या उपेक्षित मुलांच्या शिक्षण देण्यामधील कळवळा मात्र दिसून येतो. त्यांचे प्रयत्न या उपेक्षित मुलांना एक नवीन जग दाखविण्याचा, नवीन स्वप्न त्यांच्या डोळ्यात फुलविण्याचा आहे. त्यांच्या पिचलेल्या मनात काहीतरी करून दाखविण्याचे स्फूलिंग, आत्म सन्मान निर्माण करण्याची दुर्दम्य इच्छा आहे. आणि ही मुले हा वसा पुढच्या पिढीपर्यंत नेतील असा विश्वास आहे. त्यांच्या या अथक प्रयत्नाना म्हणूनच सलाम.
Reviews
There are no reviews yet.