मनोमनी
₹170.00
डॉ. मोहिनी वरदे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव त्यासाठी त्यांना करावे लागलेले अफाट अवांतर वाचन तसेच त्यांनी केलेल्या प्रवासात अनुभवलेले विविध प्रसंग, पाहिलेला निसर्ग व त्याचे विभ्रम, मूक प्राण्यांच्या वेदना, हिंस्र प्राण्यांच्या जीवनशैलीतील वैशिष्ठ्ये याचे निरीक्षण ‘ मनोमनी’ च्या विविध लेखांमधून त्यांनी अप्रतिमरित्या टिपल्याचे दिसून येते.
लेखिकेचे नाव : डॉ.मोहिनी वरदे
पृष्ठ संख्या : ९६
किंमत : रू.१७०/-
Description

त्यांनी निवडलेले विषय साधेसुधे, सामान्य वाटत असले तरी त्यांच्या लेखणीतून उमटलेल्या तरल भावना व सामजिक जाणिवांची वानवा कशी होत आहे याचे विदारक चित्रण फारच प्रभावीपणे त्यांनी मांडले आहे. त्यामुळे ते लेख वाचतावाचता त्यांची दृष्टी काही प्रमाणात आत्मसात करता आल्याचा आनंद होतो. समाजजीवनाचं चित्रण त्यांनी चिकित्सक बुद्धीने चितारले आहे. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या छोट्या प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व त्याचे भोगावे लागणारे बरे वाईट परिणाम बघितल्यावर वाचकांच्या विचारप्रक्रियेला चालना मिळते. त्यांच्या भाषेतील फुलोरा लेखांच्या सजावटीला कारणीभूत ठरलेला आहे व त्यामुळेच हे लेख वाचनीय व विचारप्रवर्तक झालेले आहेत.
Reviews
There are no reviews yet.