महायोगी शिव गोरक्षनाथ

350.00

संपूर्ण भारतीय द्विपकल्पात गोरक्षनाथांच्या पाऊलखुणा आहेत. मध्ययुगातील अस्थिर व अंधाऱ्या कालखंडात झालेल्या अशा दिव्य व्यक्तिमत्वाविषयी मिथकांची अवघी सृष्टीच उभी राहिली असल्यास नवल नाही. या अदभुतरम्य सृष्टीत शिरुन गोरक्षनाथांचा शोध घेणे हे जेवढे कठीण तेवढेच सुखद कार्य आहे.

लेखक        : टी. एन. परदेशी
पृष्ठ संख्या   : २४०
किंमत         : रू.३५०/-

Description

लेखक        : टी. एन. परदेशी
पृष्ठ संख्या   : २४०
किंमत         : रू.३५०/-

संपूर्ण भारतीय द्विपकल्पात गोरक्षनाथांच्या पाऊलखुणा आहेत. काबूल-कंदाहारपासून आसाम-कामाख्या पीठापर्यंत आणि काश्मीर,तिबेट, केदारनाथ, नेपाळपासून कंन्याकुमारी,केरळ, श्रीलंकेपर्यंत गोरक्षनाथांचे अस्तित्व आहे. भारतीय द्विपकल्पाच्या या विस्तीर्ण प्रदेशातील सर्व सागरकिनारे, अरण्ये, पर्वतशिखरे, दऱ्याखोऱ्या, निबीड अरण्ये, वाळवंटे, गावे-शहरे आणि दुर्गम प्रदेशातील तांडे- पांडे, कोठेही जा,गोरक्षनाथ भेटतीलच.येथे आणि तेथे एखाद्या दैवतासारखा त्यांचा वावर आहे. गोरक्षनाथ हे अलौकिक परंतु ऐतिहासिक व्यक्तीमत्त्व होते यात संशय नाही. परंतु त्यांच्या जीवित काळातच ते एक आख्यायिका बनून राहिले होते हेही तितकेच खरे आहे.

मध्ययुगातील अस्थिर व अंधाऱ्या कालखंडात झालेल्या अशा दिव्य व्यक्तिमत्वाविषयी मिथकांची अवघी सृष्टीच उभी राहिली असल्यास नवल नाही. या अदभुतरम्य सृष्टीत शिरुन गोरक्षनाथांचा शोध घेणे हे जेवढे कठीण तेवढेच सुखद कार्य आहे.