Sale!
चिरीमिरी
₹180.00 ₹170.00
Description
आपण जितके निसर्गापासून दूर जातोय तितके जास्त भ्रष्ट आणि राजकारणी होत चाललोय का? या नाटकात एक सुंदर वाक्य आहे.काही लीगल करण्यासाठी काही इल्लीगल करावं लागतं. पण ही त्या व्यक्तीरेखेची स्वतःची गिल्ट कमी करण्यासाठी शोधलेली पळवाट आहे आणि अशा पळवाटा शोधून जगणाऱ्यांच्या प्रवासाचा अंत वैफल्याच्याच खड्ड्यात पडून होतो.हे सगळे विचार हे नाटक उफाळून आणतं.
आत्ताच्या काळात जेव्हा खोके आणि धोके हेच सत्तेच सोपान चढायचा राजमार्ग तयार झाला आहे.तेव्हा तर हे नाटक खूपच महत्त्वाचं ठरतं.शेवटी म्हणावं असं वाटतं की षड्रीपुचा विसर्ग होऊ दे,माणूस पुन्हा निसर्ग होऊ दे …..
राजेश देशपांडे (नाटककार)
Reviews
There are no reviews yet.