चंद्रसाईचा साजण
₹200.00 ₹190.00
Description
कथेचा स्वरूप देह आणि त्यातला काव्यात्म प्राण यांच्या जिवंत संयुगाचा ‘शिला’लेख म्हणजे ललित गद्य होय…! सतीश सोळांकुरकर यांच्या ‘चंद्रसायीचा साजन’ या ललित गद्यांमध्ये याचे मनःपूत प्रत्यंतर दाटून आलेल्या घनभारासारखे रसिकांच्या मनाकाशात रिमझिमत राहते.ही तिची नि त्याची कहाणी आहे नि या कहाणीचे अनेक अध्याय प्रत्येक लेखात रंगविभोर होताना दिसतात.तो सैनिक आहे नि ती निर्मल ललना आहे.तिच्या
स्वप्नगारूडाचे असंख्य विभ्रम या सर्व ललित गद्यांमध्ये अंकुरले आहेत …!
या ललित गद्याचा गुढतम परिसर व्यक्तिरेखा म्हणून आपल्यासमोर उभा राहतो.स्मशान,त्यातील फकीराची कुटी नि त्या
कुटीमधला फकीर ही म्हणजे सत्व -रज -तमाची सावली,उंबर आणि पिंपळ हे अध्यात्मिक
प्रौढवृक्ष आणि शंभूची शांभवी असलेली संथ जलसारिणी शांभवी नदी…! या अवगुंठणात निराकार,निर्गुण असलेले शिव आणि स्वप्नविदग्धा शक्ती यांचे समावेशन या ललित गद्यात आपल्याला ठायी ठायी अनुभवता येते. तिच्या आणि त्याच्या निरागस प्रीतीचे एक अतिशय गूढरम्य चित्रण सतीश सोळंकुरकर यांनी केलेले आहे. गुढ नेहमीच रम्य असते असे नाही.गूढ कधी कधी विस्मयकारी भयानक असते,पण इथे संपूर्ण चैतन्यदायी प्रेममग्नता एका अजीब,रमलस,जादुई नगरीमध्ये आपल्याला घेऊन जाते आणि रसिकांचे मन बहुल रसमय शांभवीत खिळवून ठेवते. ‘चंद्रसाईचा साजन’ एक अनोखा ललित गद्यसंग्रह सतीश सोलांकुरकर यांनी
साहित्यकुलाला बहाल केल्यामुळे सर्व रसिकांतर्फे मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांची लेखणी अशीच अमृतानुभव प्रसवित राहो,अशी सदिच्छा व्यक्त करतो…!
– प्रा. अशोक बागवे
Reviews
There are no reviews yet.