पुन्हा येईन
₹120.00
लोकधाटीने शिष्ट परंपरेविरुद्ध लोकछंद निर्माण केले. फुटाणे यांच्या राजकीय – सामाजिक भाष्यकवितांचा मूल्यभाव निश्चित करताना ही ‘लोकधाटी’ परंपरा ध्यानात ठेवावी लागते.
कोरोनामय जग | विषाणूंचा धर्म |
कॉरंटाईन कर्म | कासावीस |
लसलशित आयुष्य |
व्हॅक्सीनचीये द्वारी |
आता मुक्ती चारी | कैसी देवा|
अशा अभंगाच्या लोकछंदात फुटाणे जेव्हा कोरोना विषाणूंचा विश्वधर्म मांडतात तेव्हा वर्तमानाचे अध्यात्म पणाला लागते. वास्तवाचा अर्थ, अस्तित्वाचा अर्थ आणि अस्तित्वाचे मूल्य कार्यरत ठेवणारी त्यांची गेल्या पन्नास वर्षांतील कविता हा महाराष्ट्राच्या भावनांचा आणि विचारांचा एक कालसुसंगत दस्तावेज आहे.
पुन्हा येईन
लेखक : रामदास फुटाणे .
ग्रंथ प्रकार : भाष्य कविता.
पृष्ठ संख्या : ८८
किंमत : १२०/-
Description
लोकधाटीने शिष्ट परंपरेविरुद्ध लोकछंद निर्माण केले. फुटाणे यांच्या राजकीय – सामाजिक भाष्यकवितांचा मूल्यभाव निश्चित करताना ही ‘लोकधाटी’ परंपरा ध्यानात ठेवावी लागते.
कोरोनामय जग | विषाणूंचा धर्म |
कॉरंटाईन कर्म | कासावीस |
लसलशित आयुष्य |
व्हॅक्सीनचीये द्वारी |
आता मुक्ती चारी | कैसी देवा|
अशा अभंगाच्या लोकछंदात फुटाणे जेव्हा कोरोना विषाणूंचा विश्वधर्म मांडतात तेव्हा वर्तमानाचे अध्यात्म पणाला लागते.वास्तवाचा अर्थ, अस्तित्वाचा अर्थ आणि अस्तित्वाचे मूल्य कार्यरत ठेवणारी त्यांची गेल्या पन्नास वर्षांतील कविता हा महाराष्ट्राच्या भावनांचा आणि विचारांचा एक कालसुसंगत दस्तावेज आहे. तात्कालिक घटिते ही या कवितेची प्रेरक असतात ;पण त्यांना शाश्वत लोकतत्वांच्या मुळांमधून अखंड शक्ती मिळत असल्यामुळे कोणत्याही काळात ती ताजी राहते. रोखठोपणा, रांगडेपणा, बेदरकारपणा व समाजहिताची कळकळ हे फुटाणे यांच्या भाष्यकवितांचे विशेष आहेत .अंतरीची धावे स्वभाव बाहेरी अशा स्वाभाविक लोकभाषेत त्या प्रकट होत असल्यामुळे निरंतर लोकप्रियतेच्या धनी आहेत.
डॉ.महेश केळुसकर
पुन्हा येईन
लेखक : रामदास फुटाणे .
ग्रंथ प्रकार : भाष्य कविता.
पृष्ठ संख्या : ८८
किंमत : १२०/-
Reviews
There are no reviews yet.