फिनिक्सचे अंतरंग
₹200.00 ₹190.00
Description
वेदना,संवेदना,भावना आणि कल्पना या चार वेदांमधून कवितेचा मानसिक वेदान्त जन्माला येतो आणि शब्दांच्या रमलखूणांतून साऱ्या वेदांताचे अर्त उपनिषद साकार होते. काव्य प्रसृत करणाऱ्या जीवाला वेदना जेवढी खोल असते,तेवढी संवेदना अबोल होत जाते.हा अबोला नि:शब्दांतून
भावनारूपात प्रकट होतो आणि कल्पनेच्या गारुडातून ‘राखेतून फिनिक्स पक्षी जसा भरारी घ्यावा’ तशी कविता
मनतळठावातून उन्मळून जिवंत धगधगत उर्ध्वगामी बरसते..!
राजश्री सावंत यांच्या ‘फिनिक्सचे अंतरंग’ .. या पहिल्या कवितासंग्रहात याची प्रचिती रसिकांना वारंवार येत राहते आणि रसिक विचारगर्भ आवर्तात हरवून जातो.
पेटली मशाल /अस्वस्थली वात /शोध दीपज्योत/अंतरीची //(प्रदक्षिणा) कधी मादक,कधी दाहक,कधी रोमांचित,कधी विवंचित,कधी पिसारा,कधी शहारा,कधी आतुरलेले मन,कधी विखुरलेले मन,कधी लसलसती वीज,कधी मर्मबंधी झिज,कधी चिरंतन ध्यास,कधी स्वयंभू मनवास अशी शब्द वैखरीची साधना ‘फिनिक्सचे अंतरंग’मध्ये प्रगल्भपणे निरंतर द्रगोचार द्रगोचर होत राहते…!
राजश्री सावंत यांच्या भविष्यकालीन वाटचालीस सर्व कवी कुलातर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो …!
-अशोक बागवे
Reviews
There are no reviews yet.