Sale!

दृष्टी सृष्टीचे आगर

200.00 190.00

Category:

Description

आपण सगळे रसिक भावना प्रकट करतो आणि कलावंत संवेदनेला मूर्त रूपात साकारतो. रसिकांमध्ये रसग्रहण करणारा जीव आणि कलाकार हा रसवंती करणारे शिवतत्व असते.

जीवा शिवाच्या मिलनातून सकस कला अवतरते.त्या कलेचा आदर करणारे रसिक ज्यावेळी संख्येने वाढतील,तेव्हा त्या त्या भूगोलाचे सांस्कृतिक पर्यावरण वृद्धिंगत होईल.इतिहास हा संस्कृतीतला सकस कला – वेदनेतून समृद्ध होतो आणि भूगोल मातीच्या रसमय संवेदनेतून समृद्ध होतो. त्या त्या मातीची निर्गुणमय अवस्था सगुन साकार करणे,हे कलावंताच्या कलेचे मर्म आहे. संवेदना ही हृदयाच्या नेनिवेतून उमलते.संवेदनेमध्ये वेदना सुखरूप असते.ती कलाविष्काराने ‘सर्व सुखाचे आगर’ होते. मग ‘बाप

रखुमादेवीवरु’ हृदयात सावयव प्रकटतो !

………………

 

स्त्री ही चारुगात्री आहे…! ती जशी गात्रसुख देते,तशी ती

शास्त्रसुखही देते.स्री ही सृजनशास्त्री आहे.तिची प्रत्येक कृती ही सृजन निर्मितीचे पाऊल ठरते.पण त्याचवेळी ती पराशक्ती होऊन रक्षणही करते आणि कालत्रही होऊन विलयही करते…! स्त्री अनादी काळापासून जशी शांत ज्योती प्रमाणे तेवत असते,तसेच ती मनात अव्यक्त ज्वालामुखी धूनसत ठेवते.स्त्रीला संपूर्ण आणि परिपूर्ण व्यक्ती म्हणून कधीच वागताही येत नाही आणि व्यक्तही होता येत नाही.कधी वयाचे,तर कधी संस्कारांचे,तर कधी संसाराचे,तर कधी नात्यांचे ओझे कायम तिच्या माथी लागलेले असते.

……………………..

(अशा अनेक ललितगद्यांची मर्मबंधातील ठेव…….म्हणजे ‘दृष्टीसृष्टीचे आगर ‘….!)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दृष्टी सृष्टीचे आगर”

Your email address will not be published. Required fields are marked *