उष:काल होता होता

260.00

उष:काल होता होता या ग्रंथात प्रा. पु. द. कोडोलीकर यांनी थोर विचारवंत साहित्यिक टॉलस्टॉय यांच्या ‘वॉर अँड पीस’ या अविस्मरणीय कादंबरीचा परिचय करून दिला आहे. ‘हातमागाचे गीत’या कादंबरीत थोर संत कवी कबीर यांच्या तत्कालीन विणकर समाजाच्या दारुण समस्यांचं भेदक चित्र आहे.

उष:काल होता होता
लेखक  : प्रा. पु. द. कोडोलीकर
पृष्ठसंख्या  :  १७६ पानी
मूल्य   : रुपये २६०/-

Category:

Description

केरळमधील नायर समाजाच्या जीवन पद्धतीवर मर्मभेदी भाष्य आहे. संमेलनाध्याक्ष आणि थोर साहित्यिक फा. दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणाविषयी त्यांनी आपले विचार मांडले आहेत. इंग्रजीतील नामवंत लेखिका शांता गोखले यांनी अनेक नामवंत मराठी नाटककार यांच्या नाटकांचा, लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र यांचा अनुवाद केला आहे. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाविषयी स्त्रिवादी भूमिकेतून लिहिलेलं आत्मकथन वाचनीय आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या परदेशातील वास्तव्यामध्ये प्रखर ध्येयवादाबरोबरचं आपलं चरित्र किती प्राणपणानं जपलं होतं  याचं भावस्पशीं चित्र थोर साहित्यिक, संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांनी आपल्या अजोड शैलीत रेखाटले आहे.

सध्या वाचन संस्कृतीला सुबत्तेचं  ग्रहण लागलं आहे. या ग्रंथात ललित्यापूर्ण शैलीत लिहिलेल्या लेखांमुळे ते अंशत: दूर होईल असा विश्वास वाटतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उष:काल होता होता”

Your email address will not be published. Required fields are marked *