Smrutishilpe
₹400.00
Description
श्री.मुरलीधर नाले हे आजवर सचोटी निष्ठा आणि नितळ निकोप मैत्री ही मूल्यं मानत आले आहेत आणि त्यानुसार त्यांचे वर्तन राहिले आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी डेप्युटी सेक्रेटरी या पदावर काम केले. त्या काळात शरद पवार,विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे या मंत्र्यांसोबत आणि शरद काळे,विश्वास पाटील,नीला सत्यनारायण या अधिकाऱ्यांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. अशा असामान्य आणि बुद्धिमान व्यक्तींपैकी २१ व्यक्तींची चित्रे त्यांनी रंगविली आहेत. अशा प्रकारच्या लेखनाला आवश्यक असणारी नजर व त्या व्यक्तींच्या संदर्भात आलेल्या चांगुलपणाचे समर्थ चित्रण करणारी शब्दकळा त्यांना लाभली आहे.हीच स्नेहमय चित्रे श्री.मुरलीधर नाले भावनेने चिंब भिजलेल्या लेखणीने रेखाटत जातात.मात्र हीच लेखणी आपल्या इंजिनियर झालेल्या, अनेक गोष्टींमध्ये रस असलेल्या चैतन्याचा उत्साह भरून असलेल्या,नातवाच्या अनपेक्षित जाण्याने व्यथित होऊन भावव्याकुळ आठवणीत बुडतात. वाचकांच्या मनाला चटका लावून जातात.
-डॉ.अनंत देशमुख
Reviews
There are no reviews yet.