Sale!

सफर एका अनोख्या विश्वाची

350.00 325.00

Category:

Description

ही आहे विविध क्षेत्रात,स्वतःच्या मर्जीनुसार मुशाफिरी केलेल्या ‘श्रीनिवास नाडगौडा’ नामक अवलियाची रोमहर्षक कहाणी. ह्यामध्ये मुख्यत्वे जीवावर उदार होऊन,तस्कर व त्यांनी तस्करी केलेला माल पकडल्याच्या थरारक कथा आहेत.त्याबरोबर मादक द्रव्य उत्पादन करणाऱ्या फॅक्टरींचा शोध घेऊन त्या जमीनदोस्त करण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची ही यशोगाथा आहे.

कर्तुत्वावर राष्ट्रपती पुरस्काराची मोहर उठल्यावर,आयुष्याला वेगळं वळण देत एक यशस्वी बिल्डर बनून स्वतःला सिद्ध करणारे दुसरी इनिंग ह्यात आहे. जीवनावर भरभरून प्रेम करणाऱ्या या कलंदराने भ्रमंतीच्या वेडापोटी बराचसा हिमालय पालथा घातला. शरीराबरोबर मनाचे आरोग्य जपण्यासाठी योगाभ्यासाची कास धरलीय.

निसर्गाबरोबर जोडलं राहण्यासाठी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या धसई गावात जमीन घेऊन त्यावर हिरवागार मळा फुलवलाय.

हे सर्व सांभाळून हा भूमिपुत्र गेली ९ वर्षे,एक सामाजिक जबाबदारी मानून,आपल्या सोसायटीचे सेक्रेटरीपद सांभाळतोय.

या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा हा जीवनप्रवास,वाचकांना खेळवून ठेवेल यात शंका नाही