Pratishodh

Description

प्रतिशोध

दोस्ती के आकाश मे,

कोई छेद नही होता.

छोरी हो या छोरा,

कोई भेद नही होता…|

आजचा कॉलेज लाईफ बघायचं झालं तर काय डोळ्यासमोर येतं?कानात इअरबड्स घालून फिरणारी आण छपरी फेम हेअर स्टाईल करणारी पोरं, शॉर्टस ट्रेंडिंग कॉस्च्युम घालणारी अन फ्रेशर्स पार्टी – फेअरवेल सेरेमनी मध्ये धिंगाणा घालणाऱ्या पोरी, बिनधास्त लेक्चर बंक मारणारी अन मोबाईल मध्ये झूम करून वाचणारी पोरं पोरी लगेच क्लिक होतात.आताची पिढी लई ॲडव्हान्स आहे.यांना सगळ्यातलच सगळं कळतं.

पण …जर यांच्या लाईफ मध्ये एक अलग ट्विस्ट आला, ज्याचं उत्तर गुगल सर्च करूनही मिळणार नसेल तर?अशावेळी त्यांच्यातील अभिमन्यूला हा आयुष्याचा चक्रव्यूह भेदता येईल?

याचाच शोध लावण्यासाठी आपल्यासमोर पेश होत आहे… कॉलेजमधल्या मैत्रीची इनसाईड स्टोरी..

प्रतिशोध