Ichha

Description

इच्छा

आधुनिक जगातील न्यूरो स्कॅन कोडींग सिस्टीम ते समुद्रातील एक बेट, आदिवासी वस्तीच . आधुनिक जगापासून दूर दूर असलेला हा प्रदेश परंतु कल्पतेचा योग्य उपयोग करून त्यांना शब्दांकित करणे ही कला लेखिकेला अवगत असावी. रक्ताची नातीच जेव्हा क्रूर होतात तेव्हा एक चांगली प्रबळ इच्छाशक्ती कशी प्रगट होते हेच ‘इच्छा’त बघायला मिळते.

आता पुढे काय सारख्या कथा विचार करायला भाग पाडतात की खरंच पुढे काय ? मन पुन्हा उभारी धरते.फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाणारी एक समर्पित प्रेम कथा. काही कथा या वाचकाला अगतीक करतात.उत्सुकता शिगेला पोहोचते. लेखिकेच्या मनातील अनेक पदर उलगडणारा हा कथासंग्रह. जगलेल्या,जगू पाहणाऱ्या काही काल्पनिक भावनांना शब्दांत मांडण्याचा उत्तम प्रयत्न.आपल्या आजूबाजूला माणूस म्हणून जगणाऱ्या एका बाईला,आईला, आत्याला आपल्याच मुलांची वाईट नजर आणि दूषित विचार का कळू नये? आणि एका मुक्या प्राण्याला ते कळून चुकले. देवाच्या साक्षीने तसा यथायोग्य न्याय .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ichha”

Your email address will not be published. Required fields are marked *