मी प्रतिभा बोलतेय

120.00

वैद्यकीय क्षेत्रातील माझ्यासारख्या माणसाला क्रीडाक्षेत्रात समव्यवसायी व्यक्ती भेटणे हा अनेक अर्थाने आनंदाचा क्षण वाटतो. महाराष्ट्र राज्याच्या महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रतिभा गोखले हया एम.बी.बी.एस.या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थिनी आहेत ही गोष्ट त्यांना आणि क्रीडक्षेत्राला निश्चितच भूषणावह आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी या दोन्ही क्षेत्रातील त्यांची झेपही खासच कौतुकास्पद.

मी प्रतिभा बोलतेय
लेखक: प्रतिभा गोसावी
आत्मचरित्र
पृष्ठ संख्या: ९०
किंमत : १२०/-

 

Description

वैद्यकीय क्षेत्रातील माझ्यासारख्या माणसाला क्रीडाक्षेत्रात समव्यवसायी व्यक्ती भेटणे हा अनेक अर्थाने आनंदाचा क्षण वाटतो. महाराष्ट्र राज्याच्या महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रतिभा गोखले हया एम.बी.बी.एस.या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थिनी आहेत ही गोष्ट त्यांना आणि क्रीडक्षेत्राला निश्चितच भूषणावह आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी या दोन्ही क्षेत्रातील त्यांची झेपही खासच कौतुकास्पद. शिवाजीपार्क दादरच्या लोकसेना या संघातून त्यांच्या खेळाची जडणघडण झाली.शाळेत असताना हिंद ट्रॉफी ही मानाची ट्रॉफी त्यांनी सतत तीन वर्ष जिंकली. अनेक स्थानिक व परगावचे सामनेही गाजविले. रुईया कॉलेजला असताना त्या कॉलेजचा संघ दोन्ही वर्ष अजिंक्य होता. आणि पहिल्यापासून त्यांची मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली. कित्येक वर्ष सतत अजिंक्यपद बंगलोरला मिळाले त्यात त्यांचा मोठा वाटा होता.नागपूरला त्या मुंबई विद्यापीठाच्या संघनायिका होत्या. कोल्हापूरला १९६६ साली राज्य क्रीडामहोत्सवात अजिंक्य ठरलेल्या मुंबई जिल्ह्याच्याही त्याच कर्णधार होत्या. हैद्राबाद,कऱ्हाड या दोन्ही ठिकाणच्या अ.भा. सामन्यात त्या महाराष्ट्र राज्याकडून खेळल्या आणि यंदा त्यांना कप्तानपदाचा मान मिळाला. पळतीच्या पहिल्याच बॅचमध्ये त्यांचा समावेश हमखास असतो.पळतीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूत त्या प्रमुख आहेत.भरपूर स्टॉमिना आणि पळतीला लागणारी सर्व प्रकारची कौशल्य यांचा त्यांच्यात सुरेख समन्वय आहे. अनेक मोठ्या सामन्यातही त्या सात मिनिटांच्या डावात पाच अथवा सहा मिनिटे एकट्याच पळाल्या आहेत.खुंटावर मारण्याचे कौशल्य आपल्यामध्ये नाही या स्वरूपाच्या स्वतःच्या कमतरतेचीही जाणिव स्पष्टपणे ठेवणारा खेळाडू हा मला नेहमी चांगलाच खेळाडू वाटतो.

मध्यप्रदेश राज्याच्या बलाढ्य संघाशी यशस्वीपणे मुकाबला करून आपला संघ अजिंक्यपद मिळवेल अशा निर्धाराने त्यांच्या नेतृत्वाखाली सराव करणारा सराव शिबिरातील महाराष्ट्र राज्य महिला संघामागे माझ्यासारख्या हजारो क्रिडा शौकीनांच्या शुभेच्छा उभ्या आहेत.

नरेंद्र दाभोलकर

मी प्रतिभा बोलतेय
लेखक: प्रतिभा गोसावी
आत्मचरित्र
पृष्ठ संख्या: ९०
किंमत : १२०/-

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मी प्रतिभा बोलतेय”

Your email address will not be published. Required fields are marked *