अरण्यरुदन
₹350.00 ₹315.00
विश्व बँक,आंतरराष्ट्रीय मुद्राकोष आणि विश्व व्यापार संघटना ह्यांनी आपले हातपाय एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे पसरवून विकसनशील देशातील ज्ञान,विज्ञान,सेवाक्षेत्र आणि व्यापार यांचे पूर्णपणे बाजारीकरण केले आहे.राष्ट्राच्या पातळीवर जागतिकीकरण आणि उदारमतवादाच्या घोषणांनी आमची संसाधने गिळंकृत केली आहेतच पण सहज उपलब्ध असलेले स्वस्त श्रमदेखील त्यांनी आपल्या कब्जात घेतले आहेत.वर्चस्ववादी ताकदीच्या ह्या खेळात गरीब अजुन गरीब होत आहेत.गरिबांचे अस्तित्वच नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जातेय.
अरण्यरुदन
मूळ लेखक : भालचंद्र जोशी
अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
पृष्ठ संख्या : २६४
मूल्य : रु.३५०/-
अनुवादित
Description

ह्या पार्श्वभूमीवर ‘प्रार्थना मे पहाड’ ह्या मूळ कादंबरीचा मराठी अनुवाद ‘अरण्यरुदन’ समोर येत आहे.नोकरी पेशाने इंजिनियर असलेल्या भालचंद्र जोशी ह्यांनी नोकरीनिमित्त दीर्घकाळ आदिवासी प्रदेशात व्यतित केला.आदिवासींचे सरळ जीवन,त्यांचे प्रश्न आणि उत्तर आधुनिक जीवनातील त्यांच्यावरील वाढते दृष्प्रभाव ह्यांचे चित्रण त्यांनी ह्या कादंबरीतून केले आहे.त्यांच्या लिखाणातून दुर्लक्षित,काढवर ढकलला गेलेला आदिवासी समाज त्याचा वास्तविक रुपात आपल्यासमोर येतो.भांडवल,सत्ता,राजकारण आणि माध्यमे देखील आपली पतनशील चारित्र्याच्या रुपात आपल्यासमोर येतात.जसजसे आपण कादंबरीत खोलवर उतरत जातो,तसतसे आपल्या लक्षात येते की,ही व्यवस्था फक्त एका गावाची नाहीये.ह्या गावातील आदिवासींचा संहार केवळ मिस्टर बजाज ह्यांच्या हातातून झालेला नाहीये तर ती व्यथा संपूर्ण जगाची बनून आपल्यासमोर येते आहे.ही कादंबरी वाचल्यावर सुरक्षित जीवन जगणाऱ्या आपल्यासारख्यांच्या मनांवर एकतरी ओरखडा उठल्याशिवाय राहणार नाही.
Reviews
There are no reviews yet.