Swarsakshi

360.00

Category:

Description

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके एका मराठी माणसाने रोवली.त्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटांनी साऱ्या चित्रपटसृष्टीचे डोळे दिपविले. भारतीय चित्रपट संगीताने अवघ्या विश्वाचे कान तृप्त केले. चित्रपट संगीताचा श्वास म्हणजे लता,आशाचे स्वर ! या स्वरांचा श्री गणेशा करण्याचा आणि पाचही मंगेशकर भावंडांचे पहिलं गाणं रेकॉर्ड करण्याचा मान दत्ता डावजेकरांनी अर्थात ‘ डीडी ‘ यांनी मिळवला.

….पुन्हा एकदा मराठी माणूस!!

डीडी यांच्या चित्रपट संगीतातील अष्टपैलू कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणार हे पुस्तक रसिकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही.अनेक लेखकांबरोबर सुरेश चांदवणकरांच्या लेखातील डीडीच्या आठवणी डॉ. मृदुला दाढे – जोशी यांनी डीडी च्या संगीतशैलीचे केलेले विश्लेषण डॉक्टर चारुशीला दिवेकर,संगीता शेंबेकर,विनायक जोशी आणि अशोक पत्की यांचे माहितीपूर्ण लेख, त्याचबरोबर मंगला

खाडीलकरांनी डीडी यांची घेतलेली ‘ एक अधुरी मुलाखत ‘ व डीडी यांनी लिहिलेली एक अप्रकाशित ‘ भयकथा ‘ वाचकांना औत्सुक्यपूर्ण आनंद देईल.डीडी यांची जेष्ठ कन्या अपर्णा मयेकर यांनी प्रोत्साहित केलेल्या भावी पिढ्यांचे स्वयंस्फूर्त लेख,पुस्तकाबद्दल एक वेगळी आपुलकी निर्माण करतात. रक्ताची नाती आणि निस्वार्थी प्रेमाने भारावलेली माणसे या पुस्तकातून डीडींची एक वेगळीच ओळख निर्माण करून देतील असा आत्मविश्वास वाटतो.

– प्रा.कृष्णकुमार गावंड

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Swarsakshi”

Your email address will not be published. Required fields are marked *