सुजाता
₹400.00
रामायणातील, महाभारतातील,पुराणातील पात्रांचा जसा संदर्भ यात लावलेला आहे,त्याचप्रमाणे वाड्मयातील पुष्कळ लेखकांचे संदर्भ लेखकांच्या, कवींच्या नावानिशी जोडलेले आहेत.जीवन जगण्याची दोन नंबर वाल्यांच्या चुकीच्या कल्पना,त्यात सज्जन लोकांची घुसमट व झालेला त्रास.जीवनाच्या खोट्या कल्पना घेऊन जगणारे लोक या कादंबरीत दिसतात. प्रत्येकाच्या मनातील वेगवेगळा माणूस यात दाखविला आहे.शेवटी उत्तम चटका लावणारा आहे.
लेखक : पंढरीनाथ कोळी
पृष्ठसंख्या : २४८ पाने
पुस्तकाची किंमत : रु.४००/-
पुस्तकाचा प्रकार : कादंबरी
Description
लेखक : पंढरीनाथ कोळी
पृष्ठसंख्या : २४८ पाने
पुस्तकाची किंमत : रु.४००/-
पुस्तकाचा प्रकार : कादंबरी
मी मोठ्या गर्वाने छातीवर करून सांगू इच्छितो की, प्राध्यापक पंढरी माझा माझ्यापेक्षा लहान भाऊ आहे त्याची ही आणखी एक कादंबरी.सदर कादंबरी वाचतानाच मला प्रत्येक घटनेत,व्यक्तीत त्यांच्या व्यक्तिमत्वात माझे पंढरीची छाया दिसली.सदरची कादंबरी त्याच्या इतर कादंबरी सारखीच ग्रामीण जीवनावर आधारित असून शहरी जीवनाचा व शैक्षणिक आणि वाडमयीन व पौराणिक ज्ञानाचा त्यात माफक वापर केला आहे.सदर कादंबरीची पात्रे खेड्यामधलेच पण सत्याचा विजय,खरे वागणाऱ्याला क्लेश पण त्याचीच सरशी या प्रमाणेच रचना पाहावयाला मिळते.पण रामायणातील, महाभारतातील,पुराणातील पात्रांचा जसा संदर्भ यात लावलेला आहे,त्याचप्रमाणे वाड्मयातील पुष्कळ लेखकांचे संदर्भ लेखकांच्या, कवींच्या नावानिशी जोडलेले आहेत.जीवन जगण्याची दोन नंबर वाल्यांच्या चुकीच्या कल्पना,त्यात सज्जन लोकांची घुसमट व झालेला त्रास.जीवनाच्या खोट्या कल्पना घेऊन जगणारे लोक या कादंबरीत दिसतात. प्रत्येकाच्या मनातील वेगवेगळा माणूस यात दाखविला आहे.शेवटी उत्तम चटका लावणारा आहे.
तसेच तीर्थक्षेत्रे,त्यांचे महात्मे व तेथील घडलेल्या घटनांचा आकर्षक मेळ व ह्या सर्व प्रकारात माणुसकीचा अखंड खळखळ वाहणारा झरा लेखकाने वाचकांसमोर दृश्य केला आहे.कादंबरीचे खरे यश वाचकाला आणखी पुढे काय वाचायला मिळेल, कोणत्या घटना व कल्पना येतील याची अभिलाषा जागवत ठेवण्यात लेखकाचे यश आहे.उत्तरोत्तर अशाच सरस कलाकृती लेखकाच्या लेखणीतून उतरोत हीच इच्छा.
ॲड. जे व्ही कोळी
जळगाव
Reviews
There are no reviews yet.