Smaran Maharashtrache
₹360.00
Description
इंद्रधनुष्यात सात रंग असतात. मात्र या रंगांचा एकत्रित परिणाम विलोभनीय असतो.’ स्मरण महाराष्ट्राचे…निमित्त भटकंतीचे ‘ हे पुस्तक रामदास खरे नावाचा एका फिरस्त्याने रेखाटलेले इंद्रधनुष्याच आहे.त्यात सप्तरंगच नव्हे तर त्याहूनही अधिक रंग आहेत.कवी,लेखक,चित्रकार असलेल्या रामदास खरे यांनी भटकंतीतून जे रंग टिपलेत त्यांची शब्दचित्रे त्यांनी या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात रेखाटली आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणांना भेटी दिल्या,त्यांche केवळ ऐतिहासिक वर्णन करण्यात ते रमत नाहीत तर वर्तमानावरही बोट ठेवतात. ते ठाण्याचे रहिवासी.ठाणे असो आलम महाराष्ट्र.त्यांनी ज्या ज्या ठिकाणांना भेट दिली,तिथले वर्णन करताना रामदास खरे यांची लेखणी तटस्थपणे जे दिसते ते सांगते.ठाण्यातल्या सिद्धेश्वर तलावाला अनाधिकृत बांधकामाचा विळखा पडल्याने त्याचे आक्रसून जाणे जसे खरे यांना अस्वस्थ करते तसेच पुण्यामधील आयुकातील ग्रहताऱ्यांच्या विश्वास ते वाचकाला सहज घेऊन जातात. रामदास खरे हे अस्सल भटके. समरसून पाहतात व रसरसून लिहितात. वेरूळच्या ‘ कैलास मंदिरापासून ‘ ते औरंगाबादच्या ‘ बीबी का मकबरा ‘ पर्यंत, कोल्हापूरच्या इतिहासापासून मुंबईच्या साहेबी वास्तुंपर्यंत, तसेच महाराष्ट्रातील गड किल्ले, मंदिरे, लेणी , सिनेगॉगसहीत बाकीची प्रार्थना स्थळे असे काही काही म्हणून त्यांना वर्ज्य नाही. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वास्तू, ठिकाणची दिलेली आटोपशीर माहिती. रामदास खरे वास्तूच्या माहितीरूपी खजिन्याची चावी लेखाच्या रूपाने वाचकाहाती देतात.प्रत्येकाने तो खजिना आपापल्या नजरेने टिपावा. त्यातच या पुस्तकाचे खरे पण सामावलेले आहेत
समीर परांजपे, मुंबई.
Reviews
There are no reviews yet.