Wari Nisarg Ranganchi

Description

वारी निसर्गरंगांची

डॉक्टर सुजाता चव्हाण या व्यवसायाने डॉक्टर आहेत. रुग्णसेवा हे त्यांनी घेतलेले व्रत आहे. त्याबरोबर हेही खरं आहे की त्यांच्यापाशी उदंड उत्साह आणि रसिकता आहे. त्या निसर्गवेड्या आहेत. आणि त्यांचं निसर्ग वाचन कौतुकास्पद आहे त्यांच्यापाशी सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि लेखनोर्मी आहे. त्यांचे निसर्गप्रेम आणि निसर्ग वाचन तितक्याच तरल, काव्यात्म भाषेत ठिकठिकाणी प्रत्ययाला येते.त्याचबरोबर त्यांनी दिलेले अनेकविध काव्यसंदर्भ आणि साहित्यिक दाखले त्यांच्या ठिकाणची व्युत्पनता स्पष्ट करते. ते वाचत असताना आपल्यालाही असा सुखद अनुभव घेतला पाहिजे असे भावना उत्पन्न होते. हे सारे लेखन निसर्गविषयक श्रद्धेने आणि भक्तीने झाले आहे म्हणूनच पुस्तकाच्या शीर्षकात त्यांनी हेतूता: वारी हा शब्द समर्पकपणे वापरला आहे.

सारांश,’वारी निसर्गरंगाची’ हे डॉक्टर सुनिता चव्हाण यांच्या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे वाचन म्हणजे एका साहित्य,कला, इतिहास,परंपराप्रेमी,सुसंस्कृत व्यक्तीने प्रसन्नपणे केलेल्या भटकंतीचा साक्षात प्रत्यय देणारा विलक्षण सुखद अनुभव आहे.

-अनंत देशमुख

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Wari Nisarg Ranganchi”

Your email address will not be published. Required fields are marked *