Sale!

शरदाचे चांदणे

200.00 190.00

Category:

Description

व्यक्तिगत आयुष्याची सुरुवात मुळी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात प्राविण्य मिळवणाऱ्या शरद काळे साहेबांनी सनदी नोकरीत आपल्या खास व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला होता.शरद काळे यांनी आपल्या प्रशासकीय गुणांबरोबरच शासकीय संगीताविषयीचे प्रेम महाविद्यालयीन जीवनापासून टिकवून ठेवले होते.शरद काळे हे मराठी विज्ञान परिषदेचे आजीव सभासद होते.ते गाढे वाचक होते, त्यामुळे त्यांच्या टेबलावर व अवतीभवती कायम पुस्तके असत. एशियाटिक लायब्ररीत दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या जवळच्या लोकांना ते कायम ‘ज्ञानाचे गुगलच’ होते. शरद काळे बोलायला लागले की त्यांचे भाषेवरील प्रभुत्व,विद्वत्ता व प्रशासनावरील हुकूमत लक्षात येत असे.प्रशासकीय चौकटीची पकड सांभाळूनही माणुसकी जपणारे होते ते.

शरद काळे यांचे महाराष्ट्र प्रेम तर लखलखीत सुवर्णमुद्रेसारखेच होते.पण महाराष्ट्र,मराठी भाषा,मराठी साहित्य यांचा त्यांच्या मनोमनी ओतप्रोत स्वाभिमान जागृत होता.सनदी सेवेमध्ये उच्चाधिकारी असलेल्यांमध्ये निष्कलंक,स्वच्छ चारित्र्य,तल्लक बुद्धिमत्ता,शालीन स्वभावाचे, विनयशील,सचोटी व नैतिक परिपूर्णता असलेले दुसरे व्यक्तिमत्व सापडणे दुर्मिळच.ते म्हणजे महाराष्ट्र शासनाचे वैभवच होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शरदाचे चांदणे”

Your email address will not be published. Required fields are marked *