Suvas Ratranicha
Description
सुवास रातराणीचा
‘सुवास रातराणीचा’ या डॉ.यशवंत सुरोशे लिखित कथासंग्रहातील निम्म्याहून अधिक कथा ह्या स्त्री आणि तिच्या जगण्यातील संघर्ष व्यक्त करणाऱ्या आहेत.यातील ‘भामरे मास्तर निवृत्त होतात’ आणि ‘मोरू सासूबाईंना पत्र लिहितो’ या दोन कथांनी मर्म विनोदाचा हात धरून वाचकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे.संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या कोरोना रोगासाठीचा आठवण करून देणाऱ्या ‘कवडसा’आणि ‘फाटलेले अश्रू’ या कथांचा समावेश या कथासंग्रहात आहे. तारुण्य सुलभ प्रेम भावना काहींच्या जीवनात नवा आयाम घेऊन येतात नवथर वयातील प्रेम आणि या प्रेमाच्या आठवणी यांचे वर्णन ‘सुर तेची छेडीता’, ‘अत्तराचा फाया’ या कथांमध्ये येते.’परतफेड’ ही कथा मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करते. परिस्थिती आणि संस्कार यांच्या संघर्षातील सुवर्णमध्य कसा साधावा हे व्यक्तीसापेक्ष असते असे या कथेमधून व्यक्त होते. आपल्या समस्या आपणच सोडवायचे असतात असं सांगणारी ‘टिपळून’कथा वेगळी ठरते.
Reviews
There are no reviews yet.