Niranatil Goshti
₹300.00
Description
मराठी कथासाहित्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा आणि कथाकार प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ या प्रांतातील असल्याचे दिसून येते. मालवणी बोली भाषेत चांगल्या कथा लिहिणारे कथाकार आज मितीस तुलनेत कमी आढळतात. वैभव साटम ही तूट प्रभावीपणे भरून काढत आहे असं दिसतं. वैभव
साटमच्या कथा कोकणातील तळागाळाच्या माणसासोबत, माणुसकीभोवती फिरत राहतात आणि त्या वाचताना वाचकाला गुंतवून ठेवतात. ‘ व्यक्तीचित्रण ‘ हे वैभव साटमच्या लेखनाचे वैशिष्ट्य. त्याचं व्यक्तिचित्रण साहित्य वाचकांनाही भावलेलं आहे. अशावेळी सहाजिकच कथालेखनात आपल्या वैशिष्ट्यांचा अतिवापर होण्याचा धोका संभवतो.पण कथालेखन आणि व्यक्तिचित्रण हे दोन वेगळे साहित्यप्रदेश आहेत.कथेमध्ये विषय केंद्र असतो तर व्यक्तीचित्रणात व्यक्ती,याची जाणीव कथाकार वैभव साटम यांना असल्याचं दिसतं म्हणूनच या कथा वाचकांना गुंतवून ठेवतात
-किरण येले
Reviews
There are no reviews yet.