Mahatma Basaveshwar
₹225.00
Description
‘ महात्मा बसवेश्वर : कृतीतून प्रगतीकडे ‘ हे पुस्तक वाचताना अतिशय समाधान झाले.पुस्तक लहानच आहे पण एका
महाक्रांतिकाराच्या धार्मिक, सामाजिक,भाषिक,आर्थिक, राजकीय विचारांचा मागोवा समर्थपणे घेतल्यामुळे त्याला ‘ ग्रंथ ‘ ही संज्ञा समर्पक आहे असे वाटते.
महात्मा बसवेश्वरांच्या जीवनकार्यावर,त्यांच्या तत्त्वज्ञानावर अनेक अभ्यासकांनी विचारवंतांनी खूप लिखाण केले आहे.विविध भाषांमध्ये शेकडो अभ्यासकांनी पी.एच.डी. पदवी मिळवली आहे. पण या समृद्ध ग्रंथ संपदेकडे सर्वसामान्य वीरशैव लिंगायत आत्तापर्यंत कमी प्रमाणात पोहोचले.त्यामुळे प्रा.रेखाताईंचा प्रयत्न सर्वसामान्य समाज बांधवांसाठी निश्चितच उपयुक्त आहे.
वीरशैव आणि लिंगायत हे धार्मिक दृष्टीने समांतर विचार प्रवाह आहेत पण म.बसवेश्वर प्रणित लिंगायत धर्माची बैठक कर्मार्धिष्टीत आहे. कर्म हात धर्म आहे. या पुस्तकात प्रा.रेखाताईंनी म.बसवेश्वरांच्या समता,न्याय, बंधुता इत्यादी तत्त्वावर भारतीय संविधान आधारलेले आहे हे खूप चांगल्या रीतीने स्पष्ट केले आहे. ही तत्वे चिरंतन सत्य आहेत १२ व्या शतकाप्रमाणेच आजसुद्धा ती मानव समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक आहेत. म.बसवेश्वरांच्या जीवनात रुजलेले तत्त्वज्ञान,जीवनात जोपासलेली मूल्ये,व्यावसायिक जीवनात पालन केलेली तत्वे, सामाजिक जीवनात आचरलेली समता,अनुभव मंडपाच्या माध्यमातून रुजविलेले लोकशाहीचे बीज इ.चा आढावा घेत त्यांच्या विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञानाची ओळख वाचकांना करून देण्याचा प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ.
प्रा.विश्वनाथ हजारे
Reviews
There are no reviews yet.