दिव्य सारे जीवघेणे (सेज पर संस्कृत)

500.00

धर्म आणि परंपरांच्या कटु प्रभावाने माणूस विवेक शून्य होतो, याचे मार्मिक चित्रण करणाऱ्या ‘सेज पर संस्कृत’ या कादंबरीत संघर्षशील, दृढ निश्चयी आणि विद्रोही तरुणीची वेदना व्यक्त झाली आहे.

मूळ लेखिका : मधु कांकरिया
अनुवाद : डॉ.वसुधा सहस्त्रबुद्धे /माधवी जोग
पृष्ठ संख्या : ३०४
किंमत    : रू.५००/-
पुस्तक प्रकार : कादंबरी

Description

मूळ लेखिका : मधु कांकरिया
अनुवाद : डॉ.वसुधा सहस्त्रबुद्धे /माधवी जोग
पृष्ठ संख्या : ३०४
किंमत    : रू.५००/-
पुस्तक प्रकार : कादंबरी

धर्म आणि परंपरांच्या कटु प्रभावाने माणूस विवेक शून्य होतो, याचे मार्मिक चित्रण करणाऱ्या ‘सेज पर संस्कृत’ या कादंबरीत संघर्षशील, दृढ निश्चयी आणि विद्रोही तरुणीची वेदना व्यक्त झाली आहे. आपल्या समाजात आर्थिक दुर्बल आणि विधवा स्रीचे जीवन अतिशय असुरक्षित आणि भयानक असते. इथे अशीच एक आई आहे तिला अध्यात्म हाच मुक्तीचा मार्ग वाटतो. आपल्या तरुण मुलींनी तो स्वीकारावा असं तिला वाटतं. कारण तिची समजूत आहे की स्री ‘साध्वी’ झाली की समाजात तिचा मानसन्मान वाढतो, गरीबी दूर होते व जगणं सुसह्य होतं.परंतु तिची मोठी मुलगी याला कडाडून विरोध करते, समजावते आणि शेवटी एकटीच वेगळ्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करते.साध्वीचं जीवन आणि त्यांचा अंतर बाह्य मानसिक संघर्ष मांडणारी ही कादंबरी सामाजिक, आर्थिक विषमते बरोबर अन्याय व शोषणाचे तर्क पूर्ण चित्रण करते. लेखिका धर्माकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दिव्य सारे जीवघेणे (सेज पर संस्कृत)”

Your email address will not be published. Required fields are marked *