देवभूमी
₹320.00
भारतात सर्वात जास्त संख्येने तीर्थक्षेत्रे व पावनस्थाने ही हिमालयाच्या कुशीतील उत्तराखंड राज्यात व दक्षिण भारतातील तामिळनाडू या राज्यात आहेत. हिमालयात केलेल्या तीर्थयात्रांना विशेष अध्यात्मिक, पौराणिक, वाडमयीन महत्व आहे. प्राचीन काळापासून हिमालय हा आर्यांचे निवासस्थान राहिला आहे. येथेच हिंदू धर्माची स्थापना झाली. वेद -पुराणांची रचना झाली.
अशा ह्या पवित्र देवभूमी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या जम्मू -काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड राज्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण ज्ञात / अज्ञात पावन स्थानांची महती व माहिती सांगण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे
लेखक : प्रकाश लेले
कृष्णधवल पाने : १८४
रंगीत पाने : ४
किंमत : रु.३२०/-
पुस्तक प्रकार : प्रवासवर्णन
Description
लेखक : प्रकाश लेले
कृष्णधवल पाने : १८४
रंगीत पाने : ४
किंमत : रु.३२०/-
पुस्तक प्रकार : प्रवासवर्णन
पृथ्वीवरील यच्चयावत सुखाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे व सौंदर्याचे प्रतीक असलेल्या ह्या हिमालयाच्या प्रेमात देव-देवता सुद्धा पडले असतील आणि म्हणूनच आपले निवासस्थान, क्रीडास्थान म्हणून त्यांनी हिमालयाला जवळ केले असावे. परंपरेने तर भगवान शंकराचे हिमालयाशी नाते जोडले आहे. पवित्र नद्यांचे उगमस्थान, देव -देवतांचे निवासस्थान हीच भावना ऋषि -मुनी, तपस्वी, महात्मे, साधू -संत श्रद्धाळू भाविक ह्यांच्या मनात हिमालयाविषयीं आहे. हिमालय ही देवभूमी आहे असे ते मानतात.
तीर्थ म्हणजे पवित्र स्थान. हिंदु धर्मात जीवनालाच एक पवित्र तीर्थयात्रा म्हटले आहे. ह्या यात्रेचा अंतिम टप्पा म्हणजे ‘मोक्ष’!ही यात्रा सुकरपने संपन्न व्हावी म्हणून जीवनात तीर्थक्षेत्रे व पावनस्थानांचे दर्शन घेणे हे एक उद्दिष्ट!कारण ह्या स्थळी देव -देवतांचे वास्तव आहे ही श्रद्धा! भारतात सर्वात जास्त संख्येने तीर्थक्षेत्रे व पावनस्थाने ही हिमालयाच्या कुशीतील उत्तराखंड राज्यात व दक्षिणभारतातील तामिळनाडू या राज्यात आहेत. हिमालयात केलेल्या तीर्थयात्रांना विशेष अध्यात्मिक, पौराणिक, वाडमयीन महत्व आहे. प्राचीन काळापासून हिमालय हा आर्यांचे निवासस्थान राहिला आहे. येथेच हिंदू धर्माची स्थापना झाली. वेद -पुराणांची रचना झाली.
अशा ह्या पवित्र देवभूमी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या जम्मू -काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड राज्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण द्यात /अद्यात पावन स्थानांची महती व माहिती सांगण्याचा प्रयत्न मी ह्या पुस्तकात केला आहे. ही सर्व परमेश्वराची कृपा आहे. वाचकांना हे पुस्तक आवडेल अशी मला अशा आहे.
– प्रकाश लेले
Reviews
There are no reviews yet.