व्हायरस
₹300.00 ₹290.00
Description
मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि पत्रकारितेचा दांडगा अनुभव असलेल्या दिनार पाठक यांच्यात एक शिक्षकही आहे.त्यामुळे माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांनी पत्रकारितेत घडवले.वृत्तपत्रविद्येच्या सर्व अंगांचा प्रात्यक्षिकांसह अनुभव असलेल्या आमच्या दिनार पाठक सरांनी कादंबरी लिहिल्याचं आणि कादंबरीचा विषय कळताच अत्यानंद झाला कारण लेखनाचा हातखंडा असलेल्या दिनार सरांना नव्या विषयांचीही आस आहे.त्यांचे वाचनही विज्ञाननिष्ठ असल्यानं आव्हानात्मक विषयही ते सहज मांडू शकतात.
आज दिनांक,सकाळ, लोकसत्ता,लोकमत,प्रहार,फ्री प्रेस जर्नल अशी वृत्तपत्रं तसचं ई-टीव्ही आणि जय महाराष्ट्र अशा वृत्तवाहिन्या आणि मुंबई लाईव्ह सारखं न्यूज पोर्टल अशा विविध माध्यमांतून दिनार सरांनी काम केल्यामुळे लेखनाचे विविध फॉर्म त्यांना बिनचूक माहीती आहेत.त्यामुळेच त्यांनी कथा, ललित ऐवजी थेट कादंबरीच्या फॉर्मला हात घातला आहे.मला विश्वास आणि खात्री आहे की, त्यांची ही कादंबरी वाचकप्रिय तर ठरेलच शिवाय ती मराठी सारस्वतांचेही पहिल्या दिवसापासून लक्ष वेधून घेईल एक लेखक पत्रकार म्हणून दिनार सरांचं मराठी सारस्वतांच्या दरबारात स्वागत करताना मला विशेष आनंद होतोय.
प्रशांत डिंगणकर- कवी,पत्रकार
Reviews
There are no reviews yet.