Sale!

ऱ्हासपर्व

250.00 240.00

Category:

Description

“आपल्या मताच्या विरुद्ध असणारा,मत मांडणारा, बोलणारा हा आपला शत्रुच मानायचा.मग तो कोणत्याही विचारांचा असो. अशी प्रथाच पडली आहे. आपण दिवसेंदिवस असमंजस,असहिष्णु,आक्रमक,हिंस्र होत चाललो आहोत.सुईच्या टोकाइतकाही विरोध आपण सहन करू शकत नाही.जे चित्र राज्यकर्त्यांमध्ये,पक्षांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये दिसते,तेच आज झिरपत झिरपत संस्थांमध्ये आलंय.इतकचं काय कुटुंबातही आलंय.सर, ऱ्हासपर्वाचा हा प्रारंभ आहे.

कुठली संस्था काढा,कॉलेज असो वा बँक,वरिष्ठाला विरोध सहन होत नाही.मग तो प्राचार्य असो,कुलगुरू असो,पक्ष संघटना, युनियन्स काहीही असो. हेच चित्र दिसणार.

विरोध नको असतो ना,मग काय करायचं? सुमार,तिय्यम दर्जाची माणसं नेमयची,सुमार कुवत असणारी माणसं असली की विरोध होत नाही. राज्यकर्त्यांना म्हणूनच विद्यापीठ, संस्था,संशोधन संस्था इत्यादी सर्वत्र ठिकाणी सुमारच माणसं हवी असतात.सुमार माणूस विरोध करत नाही.होयबाच होऊन रहातो. कारण त्याला त्याची सुमार दर्जाचे खात्रीच असते.

ही मालिका असते.राज्यकर्ते सुमार कुलगुरू नेमणार.मग हा सुमार कुलगुरू त्याच्यापेक्षाही

डफ्फर विभागप्रमुख नेमणार.हे डफ्फर विभागप्रमुख सुमार प्राध्यापकांना प्रमोट करणार. चांगल्याचा राग,अपमान करणार. त्यांना अडवणार.पुढे जाऊच देणार नाहीत.

ऐंशीनंतर ही सुमारांची मांदियाळी भारतात फोफावली आहे.कुठेही जा,हेच आणि असंच हा ऱ्हासपर्वारंभ थांबवायला हवा,सर. कोणीतरी मग तो कोणीतरी मी का असेना प्रारंभ तर करूया ना”

– प्रा. ईश्वरचंद्र

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ऱ्हासपर्व”

Your email address will not be published. Required fields are marked *