सर आले धावून
₹150.00 ₹140.00
Description
‘सर आले धावून’ हे नाटक आता पुस्तक रूपात येत आहे याचा एक वेगळाच आनंद आहे. कोणत्याही कलाकारासाठी त्याचं पहिलं नाटक हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो.तो आता पुस्तक रूपाने कायम आमच्या सोबत राहणार आहे.हे नाटक पुस्तक रूपाने रसिकांना उपलब्ध होईल तेव्हा नाटक वाचताना लेखकाची शब्दशैली, भाषेची गंमत,आणि प्रत्यक्ष प्रयोग पाहिल्याचा आनंद, निःसंशय मिळणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे.मी कोणी लेखक नाही,केवळ एक अभिनेता आहे.एखाद्या नाटकाची प्रस्तावना लिहिण्याइतका मी शब्दसमृद्ध नाही.परंतु हे सगळं लिहिताना त्या ‘ विदूषकाची ‘ ज्याने कायम रसिकांना हसवलं, पण क्षणात रडवलं देखील,त्या लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आमच्या लक्षामामाची आठवण पदोपदी येत राहिली.या पुस्तक रूपाने त्याची आठवण कायम स्मरणात राहील
सुशील इनामदार (अभिनेता)
Reviews
There are no reviews yet.